नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तसंच यावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वीच योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी कोरोनावर आधारित ‘कोरोनिल’ औषधाचं लॉन्चिंग करण्यात आलं होतं. त्यावर उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागाकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली होती, त्या नोटिशीला दिलेल्या उत्तरात पतंजलीनं कोरोनावर कोणतंही औषध तयार केलंच नसल्याचा दावा केला.
कोरोनाच्या उपचारासाठी तयार केलेल्या कोरोनिल औषधावरून आता पतंजलीनं यू-टर्न घेतला आहे. आम्ही कोरोनावरील कोणतंही औषध तयार केलं नसल्याचा दावा पतंजलीनं केला आहे.
दरम्यान, बाबा रामदेव यांची संस्था पतंजली कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर २३ जूनला दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात लॉन्च करण्यात आलं. यावेळी बाबा रामदेवही उपस्थित होते. पतंजली योगपीठाने दावा केला होता की, त्यांना कोविड – 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे.
रामदेव बाबांच्या औषधाने बरा होणार कोरोना! नेमक आहे तरी काय औषधात
रामदेव बाबांच्या औषधावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच ते घ्यावं – अजित पावर
टिकटॉकवर बंदी; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केले सरकारच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

