मुंबई – कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर आणणार आहे. आचार्य बालकृष्ण यांनी स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत हे आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले आहे.
रामदेव बाबा यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने 3 दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या 7 दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. कोरोनिल औषध सकाळी आणि संध्याकाळी एकदा घेतलं जाऊ शकतं. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदत करणार आहे.
दरम्यान, आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबांच्या औषधावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच घ्यावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, यावेळी त्यांनी भारत-चीन वादावर देखील भाष्य केले. ‘जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहते, आपल्याविरोधात कुरबुरी काढतं अशा राष्ट्रांच्या विरोधात कडक भूमिका घेतली पाहिजे. उलट आपल्या नागरिकांनी चीनमध्ये तयार झालेली एकही वस्तू वापरु नये. आपल्या देशातील सव्वाशे कोटी जनतेने जर असं केलं तर चीन जागेवरच येईल असं पवार म्हणाले.
शिक्षकांच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार – अजित पवार
कापूस खरेदी खरेदी केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवा, अजित पवारांचे आदेश
‘जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनीच महाराष्ट्र घडला, यापुढेही घडत राहील’ – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

