कल्याण : राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरबुर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.
देश विरोधी काम करण्याऱ्या तब्बल ४० वेबसाईट्सवर केंद्राने घातली बंदी
दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता आणल्यानंतर हे फोडाफोडीच राजकारण पहिल्यांदाच झाले असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्व उत्सुकतेने पाहत आहेत. हे तीन पक्षाचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं विरोधकांच मत असून, आज बारामती मध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या प्रवेशाने पुन्हा सरकार मध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. तर या कोरोनाच्या महामरी काळात पुन्हा सुरु झालेल्या राजकारणामुळे नक्कीच वेगवेगळे अर्थ उपस्तिथ होत आहेत.
मात्र आता पारनेरमध्ये आपले नगरसेवक फोडल्याचा वचपा शिवसेनेने कल्याणमध्ये काढल्याची कारचा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सेना-भाजपच्या हातमिळवणीमुळे कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीने सभापती आणि उपसभापतीपद गमावले. अंबरनाथमध्ये सेनेने सभापतीपद स्वत:कडे ठेवत भाजपला उपसभापती पदाची खुर्ची दिली आहे.
कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. कल्याणमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीचे 3 असे पंचायत समिती सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरल्यानुसार सभापतीपद आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात येणार होते.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेचे सभापती व उपसभापतीपदाचे उमेदवार रविवारी अर्ज मागे घेणार होते. मात्र मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांची रविवारी सकाळी गुफ्तगू झाली आणि राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
मिलिंद सोमण यांच्या आईचे वय आहे ८१ वर्ष… पण फिटनेस तरुणाईला लाजवेल असा
हात उंचावून झालेल्या मतदानामध्ये शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांना 7 मते मिळून त्यांनी सभापती पदाची खुर्ची काबीज केली, तर राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना 5 मते मिळाली. उपसभापतीपदी शिवसेनेच्या रमेश बांगर यांना 7, तर राष्ट्रवादीसोबत गेलेले शिवसेनेचे उमेदवार भरत भोईर यांना 5 मतांवर समाधान मानावे लागले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

