Share

लॉकडानमध्येही कंपन्या बंद होत असताना पारलेची जबरदस्त कमाई ; मोडला ८२ वर्षांचा रेकॉर्ड

Published On: 

मुंबई : चहाच्या वाफाळत्या कपामध्ये पारले जीची बिस्किटे बुडवून त्याचा स्वाद चाखण्याची मजा काही औरच होती. मात्र, हीच पारले जी कंपनी काही महिन्यांपूर्वी मंदीच्या विळख्यात सापडल्याने बंद पडण्याच्या मार्गावर होती. मात्र आता पारले जी बिस्किटाने आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्रीची नोंद केली आहे. १९३८ पासून घराघरात पोहोचलेल्या पारले जी बिस्किटाने लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीची नोंद केली आहे.

पारले प्रोडक्ट्सचे मयांक शाह यांनी सांगितले कि, ‘एकूण मार्केट शेअरमध्ये आमची एकूण ५ ट्क्के वृद्धी झाली आहे. पण त्यातही ८० ते ९० टक्के वृद्धी ही केवळ पारले-जीच्या विक्रीमुळे झाली आहे. हे अनपेक्षित आहे, लॉकडाउनदरम्यान पारले जी बिस्किटाने अनेकांचं अन्न होतं. हे सामान्य माणसाचं बिस्किट आहे, जे कोणालाही परवडू शकते. अनेक राज्यांनी आपल्याकडे बिस्किटांची मागणी केली होती. तसेच राज्य सरकारं आपल्याकडे वारंवार किती स्टॉक आहे याची माहिती घेत होते असंही त्यांनी सांगितलं आहे’.

पाच रुपयांपासून मिळणारा पारले जी बिस्कीटाचा पुडा अनेक स्थलांतरित मजुरांसाठी दोन वेळचं अन्न ठरलं होतं. कित्येक किलोमीटर चालत निघालेल्या मजुरांना पोटाला आसरा म्हणून स्वस्तात मिळणारे पारले जी बिस्कीटाचे पुडे विकत घेतले होते. याशिवाय लॉकडाउनमुळे घरात अडकल्याने भूक लागल्यावर घरात काहीतरी असावं म्हणूनही अनेकांनी पारले जी बिस्किट मोठ्या प्रमाणात विकत घेतली होती. तर काही ठिकाणी गरजूंना वाटप करण्यासाठी काही समाजसेवी संस्था तसंच इतरांनाही पारले जी बिस्किटाचा पर्यायच निवडला होता. याचा मोठा फायदा पारले जी कंपनीला झाला आहे.

पारले प्रोडक्ट्सच्या एकूण १३० कंपन्यात भारतात आहेत जिथे बिस्किटांची निर्मिती केली जाते. यामधील १० जागा त्यांच्या मालकीच्या आहेत. २०२० मधील उत्पन्न पाहता पारले प्रोडक्ट्सने ३६ ते ३७ हजार कोटींची कमाई केली होती.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यात फक्त पारले जी नाही तर इतर बिस्किटांच्या विक्रीतही मोठ्या प्रमाणात वाढ पहायला मिळाली. ब्रिटानियाच्या गुड डे, टायगर, मिल्क बिकी, बॉरबॉर्न आणि मारी तसेच पारलेच्या क्रॅकजॅक, मोनॅको आणि हाईड अँण्ड सिक यांच्याही विक्रीतही कमालीची नोंद झाली आहे.

दिलासादायक : राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के

यंदा आषाढी वारीसाठी पंढरपुरात एकाही वारकऱ्याला प्रवेश नाही

१७० कामगारांना घरी जाण्यसाठी सोनूने केली खास चार्टर्ड विमानाची सोय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!