Share

Pankaja Munde : “राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर”, ओबीसी आरक्षणावरील निर्णयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील निवडणुका आता ओबीसी आरक्षणानुसार होणार आहेत.  ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देण्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात झाला. निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच ३३७ ठिकाणी निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

“‘ओबीसी आरक्षण’ स्वागत स्वागत स्वागत… आतुरतेने प्रतीक्षा करणार्‍या समस्त ओबीसींना न्याय. राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर. सरकारचे आभार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत.”, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर  करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. ओबीसी आरक्षणाबाबतीत कोर्टाचा हा सर्वांत मोठा निर्णय आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ओबीसींच्या लोकसंख्येबाबत आक्षेप घेण्यात आला होता. आज कोर्टाने याच सर्वेक्षणानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

फडणवीस सरकारमुळे ओबीसींना आरक्षण- बावनकुळे 

“गेल्या अडीच वर्षांत फक्त उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामुळे ओबीसींना न्याय मिळाला नाही. आज राज्यातील फडणवीस आणि शिंदे सरकारमुळे ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकार असते तर त्यांनी बांठिया आयोगाचा अहवाल लवकर टेबल नसता केला. तो दाबून ठेवला असता. फडणवीस सरकारने हा रिपोर्ट स्वीकारला. म्हणून आरक्षण मिळाले.”, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!