Share

पंकजा मुंडेंकडे मध्यप्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशचे प्रभारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर पंकजांकडे पहिल्यांदाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

यावेळी पंकजा म्हणाल्या, निवडणुका लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी मध्यप्रदेशची प्रभारी आहे. मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात निवडणूक सुरू आहे. तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. मी त्याचा प्रचार करणार आहे. प्रत्येक नेत्याला आपले विभाग दिले आहेत. निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे. प्रत्येकजण काम करत आहे. आमचा संकल्प हा अंत्योदयाचा आहे. राजकीय पावलं उचलतो तसं सामाजिक पावलंही उचलणार आहोत. त्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली, असे पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील ओबीसीला आरक्षण मिळालं होतं. ते पन्नास टक्क्याच्यावर गेलं होतं. हे आरक्षण रद्द होण्याची शंका असताना सर्वच्या सर्व आरक्षण रद्द झालं. त्यामुळे ओबीसींमध्ये संताप आहे. त्यावर आम्ही राजकीय आणि सामाजिक भूमिकेतून बोललो आहे. मराठा आरक्षणही रद्द झालं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संताप आहे. इतर राज्यांनीही त्यांच्या पातळीवर आरक्षणाबाबत भूमिका घेतली आहे. घटनेत देशाचे आणि राज्याचे अधिकार क्लिअर आहेत. त्याप्रमाणे बदलत्या काळाप्रमाणे काही निर्णय घेतले पाहिजे. घटनेत काही अमेंडमेंट करण्याची गरज आहे. विधानसभेच्या लेव्हलवर काही बदल करता येतात ते केले पाहिजे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!