Share

पंकज व माझा काहीही संबंध नाही, ‘तो’ केवळ मला बदनाम करण्याचा डाव-खा.रामदास तडस

Published On: 

वर्धा : तीन दिवसांपूर्वी भाजपचे खासदार रामदास तडस त्यांचा मुलगा पंकज आणि सून पूजा यांच्या अंतर्गत वादामुळे अडचणीत सापडले होते. पूजा यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून गाऱ्हाणे मांडले होते. तोच व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा मुद्दा उचलून धरला. मात्र, त्याच दिवशी रात्री पूजा आणि पंकज यांचे पुर्नमिलन होत वादावर पडदा पडला. परंतू, या सर्व घडामोडींमध्ये खासदार रामदास तडस यांचे नाव नाहक बदनाम झाले. त्यामुळे खा.तडस यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

पंकज व पुजा या दोघांचा विवाह कोरोना काळात विवाह नोंदणी पद्धतीने झाला होता. त्या वेळी घरातील सदस्य उपस्थित नव्हते. माझे व माझ्या मुलाचे राजकीय मतभेद आहेत. त्यामुळे त्याला मी घरातून बेदखल केले आहे. दोघांचा विवाह झाल्यानंतर ते दोघेही देवळी येथे आल्यानंतर मी पंकजच्या पत्नीला सून म्हणून तिचा स्वीकार केला होता. एक महिन्याच्या कालावधीत दोघांमध्ये वाद सुरू झाला. तो निवळण्याचे काम मी केले होते. त्यावेळी पंकजची पत्नी पुजा माहेरी निघून गेली होती. मी राजकारणात सक्रिय झालो असून, जनतेच्या आशीर्वादाने शिखर गाठत असल्यामुळे ते विरोधकांच्या डोळ्यात खुपले असावे. त्यामुळे पंकज व पुजाला समोर करत माझ्या नावाचा उल्लेख करत वृत्तपत्राच्या माध्यमातून माझ्यावर वार केले असे खा. तडस म्हणाले.

त्या दोघांचा अंतर्गत वाद असूनही, वर्ध्याचे प्रकरण राज्यात पोहोचले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार तडस यांच्या मुलांकडून सुनेला मारहाण होत असल्यामुळे व तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस महासंचालकांना माहिती दिली होती. विरोधकांनी प्रकरण जोडण्याऐवजी तोडण्याला महत्त्व दिले. पंकजला मी घरातून तीन वर्षांपूर्वीच बेदखल केले असून, माझा कुठलाही संबंध नाही. तो स्वतंत्र आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बदनाम करण्याचा डाव
मुलगा पंकज आणि पूजा शेंद्रे यांचे रीतिरिवाजाने लग्न झाले असून, त्यांनी चांगला संसार चालवावा, अशीच माझी नेहमी इच्छा आहे. मात्र, मुलाच्या चुकीचे मी कधीच समर्थन केले नाही, करणार नाही. पंकज आणि पूजाच्या लग्नात माझ्या काही विरोधकांनी उडी घेऊन मीठ चोळण्याचे काम केले. मुलगा म्हणून पंकजचे आणि माझे कधीच पटले नाही, २० जून, २०२० मध्येच नोटरीकडून आममुखत्यारपत्र तयार करून, पंकजला माझ्या संपत्तीतून बेदखल केले. पंकजच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला बदनाम करण्याचा डाव विरोधकांनी आखला, असा गौप्यस्फोट खासदार तडस यांनी केला.

वाद चव्हाट्यावर आणणाऱ्यांनी त्यांना मदत करावी
आता पंकज आणि पूजा यांचा विवाह झाला असून त्यांनी सुखावे नांदावे, तसेच या पती-पत्नीतील वाद चव्हाट्यावर आणणाऱ्यांनी त्यांना मदत करावी, असे आवाहनही खा.तडस यांनी केले. पंकज आपल्या पत्नीचा सांभाळ करण्यास सक्षम असून त्याला वडिलांचा कुठल्याही आधाराची गरज नसल्याचेही ते म्हणाले. या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नसतांना काही राजकीय नेत्यांसह स्थानिक विरोधकांनी मला गोवण्याचा प्रयत्न केला. आता लग्नाचा घेतलेला निर्णय पंकजचा स्वतःचा असून यानंतर त्याच्या हातून घडणाऱ्या चुकीला पाठींबा नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!