Share

फेक न्यूजमुळे करमाळ्यात खळबळ, चूकीच्या बातमीमुळे नागरिकांमध्ये घबराट

Published On: 

करमाळा –  जगभरात हातपाय पसरलेला कोरोना सोलापूर शहरात दाखल झाला आहे. प्रशासन एकबाजूला हा विषाणू इतर भागात पोहचू नये यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील एका वेब पोर्टलच्या चूकीच्या बातमी मुळे करमाळा तालुक्यात खळबळ उडालेली असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे.

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे दोन व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे परंतु सदर वेब पोर्टल ने सहा व्यक्तींना होम क्वारंटाईन केल्याची बातमी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली.सर्वसामान्य नागरिक या बातमीमुळे चांगलेच घाबरल्याचं दिसून आलं.

सदर बातमीची शहानिशा केल्यावर लक्षात आले की सहा पैकी फक्त दोन व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले होते परंतु इतर चार व्यक्तींनी प्रवास करून १५ दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला असून त्या चार व्यक्तींच्या हातावर कुठल्याही प्रकारचा शिक्का मारण्यात आलेला नव्हता. फक्त दोन व्यक्तींच्या हातावर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले होते.

या फेक न्यूज मुळे त्या चार व्यक्तींना भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच करमाळा तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. दरम्यान, वारंवार प्रशासनाकडून तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे देखील आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!