Share

IPL 2022 : काहीतरी शिजतंय..! अंबाती रायुडूनं निवृत्तीचं ट्वीट केलं डिलीट; CSKचे प्रमुख म्हणाले….

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने शनिवारी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. या अचानक निर्णयामुळे रायुडूचे चाहतेही हैराण झाले. काहींनी त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि त्याच्याशी संबंधित आठवणींच्या पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली, परंतु नंतर रायुडूने त्याचे ट्वीट हटवले. या संदर्भात सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले, की रायुडू अद्याप आयपीएलमधून निवृत्त होत नाहीये.

अंबाती रायुडूने लिहिले, ”मी आनंदाने घोषणा करतो, की हा (IPL 2022) माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. मी गेल्या १३ वर्षांत दोन महान संघांसोबत आहे. या अद्भुत प्रवासासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे आभार.” नंतर त्याने हे ट्वीट डिलीट केले. आतापर्यंत रायुडूने याबाबत काहीही सांगितलेले नाही पण चेन्नई संघाच्या सीईओने प्रतिक्रिया दिली.

काशी विश्वनाथन यांनी म्हटले, ”मी त्याच्याशी (अंबाती) बोललो आणि तो निवृत्त होत नाहीये. तो त्याच्या कामगिरीने निराश झाला होता आणि म्हणूनच त्याने ते ट्वीट केले पण त्याने ते डिलीट केले आहे. या मोसमानंतर तो नक्कीच निवृत्त होणार नाही.”

रायुडूने अचानक निवृत्ती जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही, तेव्हा त्याने निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु नंतर त्याने आपला निर्णय बदलला. ३६ वर्षीय रायुडूने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १८७ सामने खेळले असून यात एक शतक, २२ अर्धशतकांच्या मदतीने ४१८७ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!