🕒 1 min read
पाकिस्तान : पाकिस्तानचे कट्टरपंथीय मौलाना तारिक जमील यांनी कोरोना हा महिलांच्या दुष्कृत्यांमुळेचं जगभरात पसरला आहे, असा अतार्किक दावा केला आहे. महिलांच्या तोकड्या कपड्यांमुळे करोना पसरला आहे. तर त्यांनी आजवर केलेली चुकीच्या कामाची शिक्षा संपूर्ण जग भोगत आहे, असे वक्तव्य मौलाना तारिक जमील यांनी केले आहे.
कट्टरपंथीय मौलाना तारिक जमील यांनी शनिवारी एहसास टेलीथॉन फंड रेजिंग कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. “महिलांनी लहान आणि तोकडे कपडे घातल्यानेच करोनाचा धोका निर्माण झाला आहे. महिलांच्या दुष्कर्माची शिक्षा ही जगाला मिळाली आहे.” असंही ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे हे वक्तव्य जेव्हा त्यांनी केले त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील तिथे उपस्थित होते.
पाकिस्तान मानवाधिकार आयोगने या वक्तव्यासंदर्भात मौलाना जमील यांनी माफी मागण्यास सांगितले. मौलाना तारिक जमील यांनी केलेलं वक्तव्य हे त्वरित मागे घ्यावं आणि अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत माफी मागावी असं पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने म्हटलं आहे.
मी माफी मागणार नाही अशी भूमिका मौलाना तारिक जमील यांनी घेतली आहे. पाकिस्तानातील काही प्रसारमाध्यमांनी माझ्या माफी संदर्भातलं वृत्त चालवलं मात्र ते खोटं आहे. मी माफी मागणार नाही मी माझ्या मताशी आणि केलेल्या वक्तव्याशी ठाम आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown |
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
