Share

“इशू डायव्हर्ट करणं शरद पवार आणि ठाकरे यांना पेड मीडिया एजन्सीने दिलेला सल्ला”, सोमय्यांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज (१५ फेब्रुवारी ) जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आज शिवसेनेची पत्रकार परिषदही होणार आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर आज शिवसेनेकडून प्रतिउत्तर मिळण्याची शक्यात आहे. यावरच किरीट सोमय्या यांनी इशू डायव्हर्ट करणं शरद पवार आणि ठाकरे यांना पेड मीडिया एजन्सीने दिलेला सल्ला असल्याचे म्हटले आहे.

“इशू डायव्हर्ट करणं शरद पवार आणि ठाकरे यांना पेड मीडिया एजन्सीने दिलेला सल्ला आहे. आता आम्ही कोविड सेंटर घोटाळा समोर आणला. त्यात ठाकरेही फसत आहेत आणि संजय राऊत यांचे पार्टनरही फसत आहे. त्यामुळे डायव्हर्ट करणे हे त्यांची नाटकं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर १० ते १२ केसेस दाखल केले आहेत ११० केसेस दाखल केल्या तरी मी घाबरणार नाही”, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

तसेच संजय राऊत यांनी आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. टाईमपास आणि नौटंकी नंतर करा. या घोटाळ्याची कागदपत्रं दिली तरी उद्धव ठाकरे का कारवाई करत नाही? सोमय्या रोज डॉक्यूमेंट देत आहे. कागदपत्रं खोटी असतील तर मला अटक करा. धमक्या कुणाला देता? असा सवालही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!