पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) आज(१५ फेब्रु.) दुपारी ४ वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत ते कोणते खुलासे करतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतांनाच आज एका कार्यक्रमात बोलत असतांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्ही आता चॅनेलवर राहू मात्र, दुपारी ३ नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील, असे वक्तव्य केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलत असतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,‘तुम्ही तुमचं चॅनेल आमच्या कॉमेंट्सवर चालवता. मग तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत. तसेच आता जे काही करायचे आहे ते तीन वाजण्याच्या आत करु, कारण त्यानंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील. त्यामुळे दादा आपण आत्ताच आपली पब्लिसीटी करु’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, यावेळी बोलत असतांना चंद्रकांत पाटलांच्या तोंडून चुकून राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे असे बोलण्यात आले. परंतु, त्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारत लोकसभेच्या खासदार म्हंटले. तसेच काल दत्ता मामा भरणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणाले. आज मी तुम्हाला असं म्हणालो, असेही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- सचिन वाझेंची चौकशी आता सीबीआयच्या हाती
- “अंगावर आलात तर शिंगावर घेऊ…”, प्रवीण दरेकरांचा नाना पटोलेंवर निशाणा
- Shiv Jayanti 2022 : “प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नये”, गृहमंत्र्यांचे आवाहन
- “काँग्रेस शरियाच्या दिशेने जातोय का?”, अतुल भातखळकरांचा खोचक सवाल
- मुंबईतील ईडीच्या धाडींवर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “..येथे ईडी कधी जाणार?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

