🕒 1 min read
सोलापूर : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.आता या वादाने नवे वळण घेतले आहे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांना पडळकर समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर येत आहे.
‘मन की बात’ मध्ये पेट्रोल किमतींवर बोलण्याचे आवाहन जनतेने मोदींना करावे – काँग्रेस
धमकी प्रकरणी पाटील यांनी मोहोळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उमेश पाटील हे सोलापूर झेडपी सदस्य आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पाटील यांनी प्रसारित केलेल्या एका व्हिडीओवरून गोपिचंद पडळकर विरूद्धच्या तिखट प्रतिक्रियेमुळे, गोपिचंद पडळकर आणि त्यांचे समर्थक पाटील यांना धमकीचे फोन करत असल्याची माहिती समोर येत आहे.
उमेश पाटील यांचं नेमकं काय म्हणणे आहे ?
मी प्रसारित केलेल्या व्हिडीओ मधिल माझ्या गोपिचंद पडळकर विरूद्धच्या तिखट प्रतिक्रियेमुळे,गोपिचंद पडळकर व त्याचे पाळीव कार्यकर्ते खूप चिडले आहेत.मला फोन करून शिवीगाळ करतात,जीवे मारण्याची धमकी देतात व माझ्यासह साहेबांना,दादांना व सुप्रिया ताईंना खूप खालच्या स्तरावर जाऊन आर्वाच्य व घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतात.आत्ता पर्यंत मला या स्वरूपाचे धमकीचे ३/४ फोन आले.त्यामुळे वरिल धमकी देणा-यांपैकी दोन अज्ञात व्यक्ती विरूद्ध, मी काल रितसर पोलिस फिर्याद देखिल दिली आहे.
मी धमक्यांना घाबरणारा अजिबात नाही.परंतू शिवीगाळ ऐकून खूप संताप होतो.मी जर उलट शिवीगाळ केली तर ते माझा फोन रेकाॅर्ड करतील व मला पर्यायाने पक्षाला बदनाम करतील म्हणून मी असे फोन काॅल फार संयमाने हाताळत आहे.अन्यथा साहेबांना,दादांना किंवा ताईंना उलट सूलट बोलणा-यांची व शिवीगाळ करणा-यांची,मी जीभ हासडली असती.खरे तर साहेबांना,दादांना व ताईंना केलेली शिवीगाळ ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली आहे.जर कार्यकर्त्यांना ते काॅल रेकाॅर्ड ऐकवले तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोप्या पडळकरला रस्त्यावर फिरू देणार नाहीत.कदाचित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.सोलापूरचे एस.पी.श्री.मनोज पाटील यांना पुरावा म्हणून मी,ती क्लिप पाठवली आहे.त्यांनी देखिल तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.
श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची – उद्धव ठाकरे
माझी फक्त कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की,तशीही मी पोलिस फिर्याद दिलीच आहेच.परंतु जर तुम्हाला धमकी देणारे कार्यकर्ते सापडले तर त्यांना,माझा निरोप द्या की,हिम्मत असेल तर समोर येऊन शिव्या देण्याचे धाडस करून दाखवा.मग पवार कुटुबियांबद्धल आर्वाच्य भाषेत बोलण्याचा काय परिणाम होतो ते जागच्या जाग्यावरच दाखवून देऊ.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
