पुणे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, पडळकरांची जहरी टीका
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे. अस पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. महाबुध्दीवान… महानिष्ठावान… पक्ष बदलण्याचा अनुभव असलेले गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ‘पडळकर हे ज्या पक्षातून येतात त्यांची विचारधाराच जहरी आहे. ज्याच बारामतीत डिपॉजिट जप्त झालं त्याने पवारांविषयी बोलूच नये. पडळकर यांनी बहुजनाच्या अन्यायाविषयी बोलू नये. पवार साहेबांनी माझ्या सारख्या अति वंचित मुलाला आमदारकी दिली आहे त्यामुळे त्याचं बहुजनाविषयी योगदान अधोरेखित होत’. अस अमोल मिटकरी म्हणाले आहेत. इतकच नाही तर पडळकरांच हे वक्तव्य अत्यंत बालिश असून फडणवीसांनी माकडाच्या हातात कोलीत दिल असल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे.
तर, गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या आंदोलनाची हाक दिली आहे.
आता हिम्मत असेल विनामास्क बाहेर पडून दाखवा, होणार ‘इतका’ दंड
गोपीचंद पडळकर यांनी शरदराव पवार यांच्याबाबत अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का असा सवाल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

