पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पिंपरी-चिंचवड पालिकेनं कठोर निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना आता मास्क वापरणं नागरिकांना बंधनकारक असणार आहे. विना मास्क आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
…तर हक्काची काम हातातून जातील, रोहित पवारांचे मराठी तरुणांना आवाहन
सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आल्यास आता नागरिकांकडून ५०० ते १००० रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई देखील केली जाईल, असंही सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना करून देखील सार्वजनिक ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याचं पहायला मिळतंय. आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या उपाययोजनांनाही लोक सोयीनं बगल देत असल्याचं सर्वत्र चित्र आहे. या परिस्थितीत कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे.
या संकटाला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाला आता कठोर पाउलं उचलणं गरजेचं बनलं आहे. या धर्तीवर पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी घेतलेला हा निर्णय सकारात्मक म्हणता येईल. राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत विविध सुविधा दिल्या आहेत. लॉकडाउन शिथिल केला आहे. सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासात असताना चेह-यावर मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
सार्वजनिक स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. त्यापार्श्वभुमीवर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी मास्क न वापरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश काढला आहे.
मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणे, थांबणे, गाडी चालवत असताना निदर्शनास आल्यास आणि सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन किंवा त्याशिवायही थुंकल्यास अशा व्यक्तींकडून 500 किंवा 1000 रुपये दंड आकारण्यात यावा आहे. त्याबाबत तात्काळ कारवाई करावी.
…तर उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीची महापूजा करू नये, पडळकरांचा घणाघात
दंडाची वसूल केलेली रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थेत जमा करावी असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या सुमारे चारशे जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

