Share

पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या कामांचे केले कौतुक !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक प्रकरणावरून सतत टीका केली जाते. पण आज मात्र काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून मोदी सरकारवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ‘अनडॉन्टेड : सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया’ या आपल्या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या काही कामांचे कौतुक केले आहे.

पी. चिदंबरम यावेळी म्हणाले की, गंगा स्वच्छ करणे ही मोदी सरकारची चांगली मोहीम आहे. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प बाबत बोलताना चिदंबरम म्हणाले की , आधीच्या सरकारच्या तुलनेत मोदी सरकारने एका दिवसात जास्त राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केली आहे. मोदी सरकारने राबवलेला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा कार्यक्रम यशस्वी झाला, असे मला वाटते. पुढील सरकार याहून अधिक राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान यूपीएच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली आधार योजनादेखील पुढे वाढवल्याबाबत पी . चिदंबरम यांनी  भाजप सरकारची प्रशंसा केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!