🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे.
त्याचा बदला म्हणून भारतातील हॅकर ग्रूपकडून पाकिस्तानी वेबसाईट हॅक करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत मागच्या 72 तासांत पाकिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठे सायबर हल्ले झाले आहेत. आत्तापर्यंत पाकिस्तानातील 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी वेबसाईट हॅक झाल्या आहेत. इंडियन हॅकर ग्रूप ‘Team I Crew’ आणि विशेषतः अनुशुल सक्सेना यांच्या टीमने हि कामगारी केली असल्याची माहिती मिळत आहे.
पाकिस्तानमधील वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील दहशतवादी ह्ल्यानंतर काही तासांमध्ये पाकिस्तान विदेश मंत्रालयाची वेबसाईट हॅक करण्यात आली. त्यामुळे नेदरलँड् , युके आणि इतर युरोपियन देशातून ही वेबसाईट दिसेना गेली. दरम्यान, विदेश मंत्रालयाची वेबसाईट हॅक करण्यामागे भारतीय हॅकर्स असल्याचा, आरोप करण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

