Share

संतापजनक : आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला तब्बल १० हजार लोकांची झुंबड

Published On: 

मुंबई : भारतावरील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्शिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, असे असताना आसाममध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागाव जिल्ह्यात १० हजारांच्या संख्येनी लोकं एकत्र उपस्थित राहिली. यामुळे आसाममधील तीन गावांत शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

अजितदादांनी सेनेच्या ‘त्या’ नगरसेवकांना खूप समजावले पण…

नागाव जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरू आणि आमदार अमीनूल इस्लाम यांचे वडील खैरूल इस्लाम यांच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल दहा हजार लोकं उपस्थित होते. ८७ वर्षांचे खैरूल इस्लाम यांच्यावर २ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधीला दहा हजार लोकं उपस्थित होते. प्रशासनाला माहिती मिळताच जवळील तीन गाव सील करण्यात आली.

खैरुल इस्लाम यांचा मुलगा आणि धींग येथील आमदार अमीनुल इस्लाम यांनी वडिलांच्या अंत्यविधीचे काही फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक हजर असल्याचं दिसतेय. नागाव जिल्हा प्रशासनाच्या अंदाजानुसार, अंत्यविधीसाठी कमीत कमी दहा हजार जणांची उपस्थिती होती.

चिंताजनक : राज्यात आज कोरोनाच्या रेकोर्डब्रेक ६५५५ नवीन रुग्णांचे निदान

यासंदर्भात पोलिसांनी दोन गुन्हे देखील दाखल केले आहेत, अशी माहिती नागावचे पोलीस उपायुक्त जदाव सैकिया यांनी दिली आहे. या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या लोकांनी लॉकडाऊनच्या काळातील कोणतेही नियम पाळलेले नाहीत. सोशल डिस्टन्शिंगचा येथे फज्जा उडाला आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी या ठिकाणी मास्कचाही वापर केलेला नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!