Share

“…अन्यथा कोरोना झाल्यास राज्य सरकार तुमच्या उपचाराचा खर्च करणार नाही”

Published On: 

पंजाब : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर नागरिकांनी कोरोना संबंधी नियम पाळण्यात कसूर करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यामुळे रुग्ण संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झालीय. मात्र, असे असले तरी राज्यातील नागरिक कोरोनाबाबत अद्याप सावध झालेले दिसत नाही.

दरम्यान कोरोना लस घ्या अन्यथा कोरोना झाल्यास राज्य सरकार तुमच्या उपचाराचा खर्च करणार नसल्याचं पंजाब सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे. पंजाब सरकारच्या या धोरणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधित लस घेणं बंधनकारक झालं आहे.

कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना 19 फेब्रुवारीची मूदत देण्यात आली होती आता ती मुदत वाढवून 25 फेब्रुवारी करण्यात आली आहे. यानंतरही कोणी आरोग्य कर्मचारी लस घ्यायची राहिल्यास आणि त्याला कोरोना झाल्यास सरकार त्याच्यावर कोणताही खर्च करणार नाही, असं पंजाब सरकारने म्हटलंय.

लस न घेतलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्यामुळे कोणतीही सुट्टी मिळणार नाही. पंजाब सरकारने हा निर्णय घेण्यामागे महत्वाचं कारण आहे. पंजाबचे आरोग्यमंत्री बलबिंदर सिंह सिद्धू यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!