Share

भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद- प्रेमात बुडालेले तरुण प्रेमसााठी काय करतील याचा नेम नाही. अगदी सातासमुद्रापार जाण्याची वेळ आली तर तेही करण्याची तयारी प्रेमवीरांमध्ये असते. उस्मानाबादमध्येही काहीसा असाच प्रकार घडला आहे. सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. झिशान सिध्दिकी असं या तरुणाचं नाव आहे.

तो सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेमीला भेटायला गेला होता. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकिस्तानकडे जाण्याची झिशानची इच्छा होती. कथित प्रेयसीला भेटायला बीएसएफने पाकिस्तान आणि कच्छ सीमेपलीकडे फिरत असलेल्या युवकाला पकडले. उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेना खासदार पुत्राची पोलिसांशी हुज्जत, निलेश राणेंनी समोर आणला व्हिडीओ

मोठी बातमी : भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना कोरोनाची लागण

पुणे, ठाणे नंतर महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन

दुर्घटनाग्रस्त ईमारतीतील बेघर रहिवाश्यांचे तातडीने पुनर्वसन करा- दरेकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!