टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. येत्या ५ दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. हसन मुश्रीफ आणि आ. मधुकर चव्हाण अडचणीत आले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. यामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नावांचा समावेश आहे. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने निर्देश देत पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे.
- राजकारण एका बाजूला, भाऊ म्हणून उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या पाठीशी : संजय राऊत
- रविदास मंदिर आंदोलन पेटले, भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक
- राज ठाकरेंना ईडीची नोटीस, कार्यकर्त्याने पेटून घेत आयुष्य संपवले
- औरंगाबादः एमआयएमचा बंद लिफाफा प्रकाश आंबेडकरांना सुर्पूद


