Share

‘महाराष्ट्राला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे, याची सरकारला लाज वाटायला पाहिजे’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्याला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची अवस्था अगदी बिकट झाली आहे. त्यामुळे शासकीय उपाय योजना म्हणून राज्य सरकारकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचं  सांगितलं जात आहे. मात्र हे काय भूषणावह गोष्ट आहे का ? तुम्हांला लाज वाटायला पाहिजे. ‘राज्याला दुष्काळमुक्त करू’ असं म्हणून तुम्ही सत्तेत आला होतात, असे म्हणत राष्ट्रावादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच सुनावले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, दुष्काळामध्ये तुम्ही राज्यात ६ हजार ५९७ टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करत होता ही काय भूषणावह गोष्ट आहे का ? तुम्हांला लाज वाटायला पाहिजे. ‘राज्याला दुष्काळमुक्त करू’ असं म्हणून तुम्ही सत्तेत आला होतात आणि आता पाच वर्षांनी तुम्हाला राज्याला ६ हजार टँकर रोज द्यावे लागतायेत. कशासाठी स्वतःची पाठ थोपटून घेताय ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारला केला.

दरम्यान सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी सुरु आहे. याचदरम्यान, जलयुक्त शिवार योजनेवरून अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. सरकारनं सत्तेत येताच ‘जलयुक्त शिवार’ योजने अंतर्गत गावच्यागावं दुष्काळ-टँकरमुक्तीचं स्वप्न दाखवलं होत. परंतु ५ वर्षात टँकर संख्या आणि फेऱ्या वाढल्याचचं दिसत आहे. अशी टीका अजित पवार यांनीही केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!