Share

ॲमेझॉनवर विक्रेत्यांना मराठीत व्यवसाय नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा

Published On: 

नवी दिल्ली : ‘मराठी नाही तर ॲमेझॉन नाही’, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ॲमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर अमेझॉननं माघार घेत ॲमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली होती. ॲमेझॉन या शॉपिंग कंपनीच्या सेवांमध्ये मराठी भाषेच्या समावेशाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ॲमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो ॲमेझॉन वाद फारच चिघळला होता.

याप्रकरणात ॲमेझॉनने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. अखेर मनसेच्या दणक्यापुढे ॲमेझॉनला नमते घ्यावेच लागले. अखेर अमेझॉनने नमते घेत लवकरच मराठी मध्ये येत असल्याचा ॲमेझॉनचा वेबसाईटवर खुलासा केला आहे. ॲमेझॉनने आपल्या वेबसाईटवर इतर भाषांना प्राधान्य दिले असले तरी मराठीत मात्र वेबसाईट करण्यास असमर्थता दर्शवली होती.

त्यांनतर आता ॲमेझॉनने तमिळ, कन्नडपाठोपाठ मराठीतही विक्रेत्यांना व्यवसायाची नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना ऑनलाईन व्यवसायाचे व्यवस्थापन मराठीतही करता येणार आहेत. ॲमेझॉनवर मराठी पर्याय मिळाल्याने ८५ हजार विक्रेत्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्रातून नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर आणि जळगावमधील विक्रेते हे ॲमेझॉनवर विक्री करतात. ई-कॉमर्सवर उद्योगाचा विस्तार करण्यासाठी भारतीय एमएसएमई उद्योगांना भाषा हा प्रमुख अडथळा आहे. देशातील लाखो भारतीय आंत्रेप्रेन्युरसाठी भाषेतील अडथळा करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे ॲमेझॉन कंपनीने म्हटले आहे.

विविध भाषांमध्ये व्हाईस, व्हिडिओ आणि नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी बांधील असल्याचे अ‌ॅमेझॉन इंडियाचे संचालक (सेलिंग पार्टनर) प्रणव भसीन यांनी सांगितले. विक्रेत्यांना ऑनलाईन वेबसाईटवर चांगला अनुभव येण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!