Share

आता रेशनच्या दुकानावर मिळू शकतात कांदे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सर्वसामान्यांच्या डोळ्याला पाणी आणणारा कांदा आता रेशन दुकानावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानुसार एका शिधापत्रिकाधारकाला पाच किलो कांदा या प्रमाणे प्रत्येक तालुक्याला किती कांदा लागणार याची आकडेवारी जिल्हास्तरावरून घेण्यात येत आहे. त्यानुसार अंबडच्या तालुका पुरवठा विभागाने ही आकडेवारी कळविली आहे, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नंदकिशोर दांडगे यांनी दिली.

कांद्याच्या वाढत्या भावामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जालना जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना पत्राद्वारे शिधापत्रिकाधारकांच्या संख्येनुसार तालुक्याला किती कांदा लागेल याची आकडेवारी मागविली आहे. यानुसार अंबड तालुक्यात 49 हजार 306 शिधापत्रिकाधारक आहेत. त्यानुसार प्रत्येक कार्डला पाच किलो याप्रमाणे तालुक्याला जवळपास अडीचशे टन कांदा लागणार आहे. अर्थात, स्वस्त धान्य दुकानांतील कांद्याचा भाव किती राहील याची उत्सुकता लागली आहे.

रेशन दुकानात गहू, तांदूळ, साखर, तूर, हरभरा डाळीनंतर आता कांदा येणार असल्याने महागाईची झळ बसलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गत पंधरवड्यापासून कांद्याच्या भावात विक्रमी वाढ होत आहे. सध्या बाजारात कांदा सत्तर रुपयांपासून शंभर ते सव्वाशे रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. कांदा भाववाढीने सामान्य जनता व हॉटेलचालक त्रस्त आहेत.

शिधापत्रिकाधारकांची माहिती मागविलेली आहे. त्यानुसार तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना लागणाऱ्या कांद्याची मागणी जिल्हा पुरवठा विभागाला पाठवली आहे. पुरवठा विभागाकडून कांदा उपलब्ध झाल्यास तो रेशन दुकानमार्फत वितरित करण्यात येईल. अशी माहिती अंबडचे तहसीलदार, राजीव शिंदे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1202937403746373632?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1202936346832064513?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!