Share

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांदी, कांद्याने गाठली शंभरी !

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : देशात कांद्याचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कांदा किरकोळ बाजारात 70 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. अशी भाव वाढ होत राहिली तर लवकरच कांदा शंभरी पार करेल असा अंदाज बाजारात लावला जात आहे. आज कांद्याच्या दारात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जरी चांदी होणार असली तरी जनसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

गेल्या तीन महिन्यांत कांद्याच्या घाऊक बाजारात दर चारपटीनं वाढले होते. गेल्या वर्षी कांद्याचं उत्पादन कमी झाल्यानं हे दर भडकल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अवकाळी पावसानंही कांद्याचं उत्पादन प्रभावित झालं असून, यासाठी व्यावसायिकांनी सरकारच्या प्रतिकूल धोरणांना जबाबदार ठरवलं आहे. तर केंद्र सरकारनं लागोपाठ कांद्याची आयात होत असल्याचं सांगत दर घसरण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कृषी उत्पन्न पणन समितीचे अध्यक्ष जयदत्त होल्कर यांनी सांगितलं की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपात पेरण्यात आलेलं पिकांना नुकसान झालं आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील राज्यात अवकाळी पावसानं कांद्याच्या उत्पादनाला नुकसान झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1191682295125594112?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191681869722472449?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191680586844274688?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!