मुंबई : विधानसभा 2019 नंतर राज्यात वेगळ्यापद्धतीचं राजकारण अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र अधूनमधून या सत्ताकारणात काहींना काही वादळं निर्माण होताना पाहायला मिळतात. शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन याची माहिती दिलीय. येत्या शनिवार पासून 3 भागांत ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.
धनंजय मुंडे कोरोना ब्रेकनंतर पुन्हा बॅक टू वर्क
संजय राऊत यांनी ट्विटर वरून या मुलाखतीचा टिझर समोर आणला असून या मुलाखतीला ‘एक शरद…सगळे गारद’! अस नावं दिल आहे. त्यामुळे या मुलाखातीकडे संपूर्ण देशातील राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1280697533027794944?s=20
आतापर्यंत राऊत यांनी शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती.
शरद पवारांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला – प्रिया बेर्डे
आता सत्तास्थापनेनंतरची पहिली स्फोटक मुलाखत असेल. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राजकीय घडामोडींचे खळबळ निर्माण करणारे गौप्यस्फोट या मुलाखतीतून होतील, असा दावा खुद्द संजय राऊत यांनी केला आहे. सामनामध्ये शनिवार पासून या मॅरेथॉन मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणारेत. या मुलाखतीचे व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

