Share

विद्यार्थ्यांच्या गोंधळावर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘मी त्यांना जेलमध्येही टाकू शकतो!’

Published On: 

औरंगाबाद: कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन एमपीएससीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महात्मा फुले चौकात स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर येऊन सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जबाबदार भूमिका घेत म्हणाले की, मी त्यांना जेलमध्येही टाकू शकतो, परंतु मी जसा जिल्हाधिकारी आहे तसा एक चांगला पालक सुद्धा आहे. मला विद्यार्थ्यांचे करिअर खराब करायचे नाही, त्यामुळे आम्ही त्यांना समजावून आंदोलन मागे घेण्यास लावू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन दिवसावर म्हणजेच 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. हे आंदोलन मागे घेण्यासाठी पोलीस प्रशासनासह महसूल प्रशासनाने जबादारीची भूमिका घेत आंदोलन मागे घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विनंती केली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी बोललो असता, त्यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांची मागणी ही रास्त आहे. आम्ही अभ्यास केला आहे, आमची परीक्षा घ्या, अशीच त्यांची मागणी आहे. हे काही राजकीय आंदोलन नाही. ही विद्यार्थ्यांची इंस्टट प्रतिक्रिया आहे. मला त्या विद्यार्थ्यांचे करिअर ही खराब करायचे नाही. मी जसा जिल्हाधिकारी आहे, तसाच एक पालक आणि जबाबदार नागरिक सुद्धा आहे. आम्ही त्यांना समजून सांगू की या काळात अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत.

मी कारवाई करू शकतो, त्यांना जेलमध्ये टाकू शकतो, पण ते विद्यार्थी आहेत आम्हाला त्याचं करिअर खराब करायचं नाही. आम्ही त्यांना समजून सांगू ते नक्की ऐकतील अशी मला खात्री आहे. आणि एवढे करून सुद्धा त्यांनी नाही ऐकल तर आम्ही नक्की कारवाई करू असं वक्तव्य जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!