Share

राज ठाकरे यांचे ‘नऊ’ नंबर कनेक्शन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देव – धर्म आणि अध्यात्म या सगळ्या बाबींवर पूर्ण विश्वास आहे.त्यानुसार आपली सर्व महत्त्वाची कामं राज ठाकरे आपल्या लकी नंबरनुसार करतात, असं म्हटलं जाते. त्यानुसार आतापर्यंत अनेक कामं राज ठाकरेंनी ९ नंबरनुसार केले. राज ठाकरे आज 9 नंबरच्या गाडीत बसूनच ते मोर्चासाठी रवाना झाले आहेत.यातून नेहमीच राज यांचे ९ नंबर सोबत काहीतरी संबंध आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाचे विशेष म्हणजे आजची तारीख आहे. राज ठाकरे यांचा लकी नंबर ९ मानला जातो. तसेच आजची तारीखही ९ आहे त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या लकी नंबरच्या दिवशी मोर्चा आयोजित केला असल्याची चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे ९ नंबरला ‘लकी’ मानतात. पूर्वी शिवसेनेत असताना असो किंवा मग मनसेची स्थापना केल्यानंतर असो, राज ठाकरेंचं हे ९ अंकावरील प्रेम वारंवार दिसत राहिलं आहे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं देखील राज ठाकरेंनी आपला लकी नंबर जपण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.

नुकतेच विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरेंनी आपल्या प्रचाराची सुरुवात ९ तारखेपासून केली होती. पहिल्या सभेसाठी मुहूर्त मनसेने आपला लकी नंबर ९ निवडला होता. राज ठाकरे हे ९ हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा ९ या नंबरभोवती फिरताना दिसतो.

राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची भूमिका बदल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाकडे वाटचाल केली आहे. पक्षाची भूमिका बदलल्यांतर राज यांनी पहिला मोर्चा आज म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केला.आता एकंदरीत ९ तारखेला सुरु केलेला हा मोर्चा राज ठाकरे यांच्या प्रतिमेला कसा फायदेशीर ठरतो हे पाहणें खूप औत्सुक्याचे ठरेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!