Share

जबाबदार लोक प्रतिनिधींकडूनच मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग बाबतच्या सूचनांना हरताळ

Published On: 

🕒 1 min read

बीड: केंद्र सरकारमधील मंत्री रावसाहेब दानवे, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंढे , आमदार , माजी आमदार अशी जबाबदार मंडळी एकत्र आल्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतील अशी अपेक्षा स्वाभाविक आहे. परंतु या भेटीत ना कोणाच्या नाका-तोंडाला मास्क होता, ना फिजिकल डिस्टन्सिंग. याबाबतचे वृत्त सकाळने दिले आहे.

तसेच या भेटीत मुंढे यांचा घरगुती स्वरुपाचाच सत्कार सोहळाही झाला. त्यामुळे अशा जबाबदार घटकांकडून जर या गंभीर काळात असे प्रकार घडत असतील, तर सामान्यांकडून किती अपेक्षा करणार असा प्रश्न आहे.

काल कापूस खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, कापूस खरेदी वाढवणे, तूर व हरभरा खरेदी केंद्र सुरू करून त्यासाठी ग्रेडर नेमणे आदी मुद्द्यांसाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेतली.

मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित देखील होते. या तिघांमध्ये या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि दानवेंनी तोडगा काढण्याचे आश्वासनही दिल्याचे सांगीतले जात आहे. यानंतर दानवेंनी आपल्या भोकदरनच्या घरी आलेल्या या पाहुण्यांचा सत्कार केला.

यावेळी रावसाहेब दानवेंनी मुंढे यांचा सत्कार केला . पण, सध्या कोरोना विषाणूची महामारी आणि मास्क व फिजिकल डिस्टन्स हे  नित्य जगण्यातले भाग झाले आहेत. त्यासाठी जनजागृती आणि वेळप्रसंगी कारवाई देखील केली जात आहे.

पण, या दानवे-मुंडे-पंडित यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान आणि यानंतर झालेल्या सत्कार सोहळ्यावेळी कोणाच्याही तोंड – नाकाला मास्क नव्हते. फिजिकल डिस्टन्सचीही काही वेगळी अवस्था नव्हती. अशा जबाबदार मंडळींकडूनच जर असे वर्तन होत असेल तर अपेक्षा तरी कोणाकडून करायच्या असा प्रश्न आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!