पुणे : कोरोना महामारीने गेले २ महिने भारतासह जगभरात थैमान घातले आहे. दरम्यान, गेले महिनाभर देशभरात कडक लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात प्रशासनाने कोरोना बधितांच्या आकडेवारी नुसार ग्रीन, ऑरेंज व रेड झोन केले होते.
सुरुवातीला पुणे, मुंबईसह पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळेच या शहराचा देखील रेड झोन मध्ये समावेश केला गेला होता. मधल्या काही दिवसात संख्या आटोक्यात येऊन अनेकांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. मात्र, पुन्हा गेल्या आठवड्यापासून हि संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरात १२ रुग्ण आढळले असून ११ रुग्ण हे रुपीनगर भागातले आहेत.
महापालिकेने व पोलीस प्रशासनाने याआधीच पुण्याला जाणारे सर्व मार्ग सील केले आहेत, तसेच शहरातील अंतर्गत भागात जिथे रुग्ण आढळले तो भाग सील करण्यात येत होता. कंटेंटमेंट झोन मध्ये समावेश केल्यानंतर फक्त सकाळी १० ते दुपारी २ पर्यंतच किराणा, दूध, भाजीपालासाठी सवलत देण्यात आली आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार आज सायंकाळी ५ पर्यंत ८१ सध्या बाधित रुग्ण असून आजपर्यंत एकूण ३१४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

