Share

‘राज्यात तब्बल सव्वासात लाख नागरिक होम क्वारंटाईन’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे.

लॉकडाऊन हे अंतिम उत्तर नाही, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आमची भूमिका

राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-१२, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-१४, कल्याण-डोंबिवली मनपा-१४,भिवंडी-निजामपूर मनपा-१२, मीरा-भाईंदर मनपा- ५, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-७, पनवेल मनपा-१, नाशिक-७, नाशिक मनपा-१८, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, जळगाव-३, जळगाव मनपा-१, पुणे-७, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-१७,सोलापूर मनपा-३, सोलापूर मनपा-६, सातारा-५, कोल्हापूर-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-३, जालना-४,हिंगोली-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-२, बीड-१, नांदेड-३, नांदेड मनपा-३,अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

चंद्रकांतदादा तुमच्या डोक्यामध्ये राजकारण असत अन् माझ्या डोक्यात फक्त शेतकरी – राजू शेट्टी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!