Share

२३ जुलैनंतर कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवू नका, पुण्यातील व्यापारी आयुक्तांच्या भेटीला

Published On: 

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन पुण्यात आहे.

‘पुण्यात दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊन सुरु आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कडक लॉकडाऊन असेल. सोमवारी (13 जुलै) मध्यरात्रीपासून ते 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन असेल. १३ ते १८ जुलै अत्यंत कडक लॉकडाऊन त्यानतंर काही प्रमाणात शिथीलता दिली जाईल.याकाळात दूध, औषधे आणि अत्यावश्यक सेवा सुरु आहेत.

यानंतर आता लॉकडाऊनमुळे व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत लॉकडॉउनमध्ये वाढ करण्यात येऊ नये, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी शनिवारी (ता.१८) सकाळी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली. त्यावेळी चर्चा करताना २३ जुलैनंतर कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवू नये, ही आग्रही मागणी केली.

‘आमचे अध्यक्ष सगळ्या आमदारांच्या संपर्कात, देवेंद्रजीच्या हातात काहीही लागणार नाही’

तीन महिन्यांच्या लॉकडाउन नंतर व्यवसायाला कशीबशी सुरवात होत असताना पुन्हा एकदा लॉकडाउन लादल्याने व्यापारी त्रस्त झाले असून, व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. तसेच व्यापाऱ्यांना कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही तसेच करांमध्ये कोणतीही सूट मिळत नाही, एकीकडे बँकांचे व्याज, दुकानाचे भाडे, भरमसाठ लाइट बिल, कर्मचाऱ्यांचे पगार, घरखर्च असे अनेक खर्च चालू आहेत आणि दुसरीकडे व्यवसायच ठप्प असल्याने कोणतीही आवक नसल्याने व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना या संकटातून बाहेर काढणे ही सरकारचीही जबाबदारी आहे, असे रांका म्हणाले आहेत.

कोरोना आणि अर्थव्यवस्था हे दोन्ही रुळावर आणण्याची आता गरज असून, लॉकडाउनमुळे पुण्यात व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ते पुन्हा भरून निघणे अशक्य आहे. तसेच दुकानांसाठी सम-विषमचे (P1/P2) बंधन काढून टाकण्यात यावे. जेणेकरून संभ्रम न राहता व्यापारी आणि ग्राहकांनाही ते सोयीचे होईल.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मनपा आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोरोना तपासणीची शिबिरे भरवण्याचा मानस यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला. त्यालाही व्यापारी महासंघाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि २३ तारखेनंतर यावर काम करण्याचे ठरल्याचे रांका यांनी सांगितले.

गडचिरोलीत एसआरपीएफच्या ७२ जवानांना कोरोनाची लागण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!