मुंबई : भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३९३ वर पोहचली आहे. त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आत महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही ८९ झाली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात ३१ मार्च पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यात २१ मार्च रोजी जनता कर्फ्यू संपूर्ण देशात पाळण्यात आल. त्यानंतर संध्याकळी पाच वाजता सरकारचा हा आदेश धुडकावून लावत लोक मोठ्या संख्येने एकत्र आले. ही परिस्थिती पाहता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करत नागरिकांना शासनाचे निर्देश पाळण्याचे आवाहन केले आहे.
”नागरिकांना कोरोनाचे संकट गांभीर्याने घेण्याची विनंती केली आहे. ” जमावबंदीचा आदेश धुडकावून नागरिक काल सायंकाळपासून ज्या पद्धतीने रस्त्यावर येत आहेत, ते अत्यंत चिंताजनक आहे.कोरोनाविरूद्धची लढाई अजून संपलेली नाही. तर ती आता खऱ्या अर्थाने सुरू झालीय. त्यामुळे शासनाचे निर्देश पाळावेत आणि प्रवास व गर्दी करू नये, ही विनंती.” अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.
दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ”लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे. परिस्थितीचा विचार करता…अभी नही तो कभी नही”. “तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत. संकट किती भयंकर आहे याची कल्पना काही लोकांना नाही. लॉक डाउन ने भागेल असे वाटत नाही. संचारबंदी लागू करा”. अशी मागणीच त्यांनी या ट्विट मधून केली आहे.


