Share

आता माघार नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचाचं मुख्यमंत्री : संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे. तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचाचं मुख्यमंत्री असणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असणार यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत शिवसेना खा. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारचं नेतृत्व करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

राऊत म्हणाले की, महाआघाडीच्या सरकारचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनीच करावं, असं तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाला तिन्ही पक्षांनी सहमती दिलेली आहे. आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली.

तसेच पुढील पाच वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. या निर्णयावर तिन्ही प्रमुख पक्षांची चर्चा झाली असून त्यांनी सहमतीही दर्शवली आहे. शिवसेनेनं घेतलेला हा निर्णय स्वाभिमानानं घेतलेला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी घेतलेला आहे. लवकरच महाराष्ट्राला एक कणखर नेतृत्व मिळेल, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान शिवसेनेकडून सध्या मुख्यमंत्री पदासाठी तीन नाव चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे ही तीन नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रभागी आहेत. तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकाकडेचं मुख्यमंत्री पदाची धुरा जाणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1197751877783310336?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1197751815405588480?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1197748108039340033?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!