Share

आता सामनाच्या अग्रलेखाचे पुढचे काही दिवस ‘हे’ विषय असतील; नितेश राणेंची खोचक टीका

Published On: 

मुंबई : काल सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंग राजपूत प्रकरणी होत असलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीला अखेर मान्यता दिली. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

यानंतर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून या प्रकरणी अनेक बड्या व्यक्तींची नावे बाहेर येण्याच्या शक्यतेमुळे मुंबई पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप केला होता. तर, बिहार पोलिसांनी मुंबई पोलिस सहकार्य करत नसल्याची तक्रार देखील केली होती.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश

काल, सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय दिल्यानंतर भाजपाने राज्य सरकारवर घणाघाती टीका केल्याचे दिसून आले. तसेच, राज्य सरकारच्या भूमिकांमुळे आता मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत असल्याने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. यावर, आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून प्रत्युत्तर दिले आहे.

महान देशाचे महान पंतप्रधान म्हणून राजीव गांधी सदैव स्मरणात राहतील – अजित पवार

भाजपा आमदार नितेश राणे सामनाच्या या अग्रलेखवरूनच आता महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेला लक्ष्य केले आहे. नितेश राणे यांनी, ” आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय :1.) मराठी अस्मिता, 2.) महाराष्ट्र धर्म, 3.) मराठी माणूस Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही..तेव्हा डिनो,जॅकलिन ,दिशा पाहिजे असतात..वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस !,”अशी जहरी टीका ट्विटद्वारे केली आहे.

राजू शेट्टींसारख्या भंपक माणसाविषयी फार बोलावे अशी माझी इच्छा नाही – सदाभाऊ खोत

सामनाच्या आजच्या अग्रलेखात काय म्हटले आहे?

न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय व कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये व ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी व हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये. सुशांत प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे व्हायला हवाच. त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात काही शंका असतील तर त्यावर प्रकाश पडायलाच हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण प्रश्न आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा व त्यांच्यावर सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीचा!

कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य व न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखले हे बरोबर नाही, अशी आगपाखड सामनातून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीच्या दिलेल्या आदेशावर व या प्रकरणावर राजकारण करणाऱ्या नेत्यांवर करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!