Share

पुण्यातल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी आता सिरम इन्स्टिट्युटचा पुढाकार

Published On: 

पुणे : कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या वैद्यकीय उपयोगाच्या ऑक्सिजन निर्मितीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आता पुढाकार घेतला आहे. दररोज 200 कोरोना रुग्णांना पुरेल इतक्या वैद्यकीय उपयोगाच्या ऑक्सिजनच्या निर्मितीचा प्रकल्प आता पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटमध्ये उभारण्यात आला आहे. हे ऑक्सिजन सिलेंडर्स आता रुग्णालयांना मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

विशेष म्हणजे सिरमचा हा प्रकल्प प्रायमुव्ह इंजिनियरिंग या कंपनीने 12 दिवसांच्या विक्रमी वेळेत साकारला आहे. दरम्यान, पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढले होते. कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिका व जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे.याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत आता महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला पुणे शहरात प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

दुसरीकडे राज्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याच्या प्रमाणात वेगानं घट होत असून दुसऱ्या  लाटेत 10 मे रोजी प्रथमच 20 टक्क्यांच्या खाली आलेलं हे प्रमाण काल 15.91 शतांश टक्के होतं. राज्यातल्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह काल मृतांच्या संख्येतही काहीशी घट झाल्याचं आढळून आलं. काल दिवसभरात 695 मृत्युंची नोंद झाली.

राज्यातला मृत्युदर दीड टक्के आहे. काल दिवसभरात राज्यात 39,923 नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे आता राज्यातल्या कोरोना बाधितांची एकंदर संख्या 53,09,215 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात राज्यात 53,249 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 88.68 शतांश टक्के झालं. सध्या राज्यात कोविड 19 च्या 5 ,19 , 254 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!