Share

व्हॉट्सअॅपवरुन देखील पैसे ट्रान्सफर करता येणार ! व्हॉट्सअॅपने आणले पेमेंट फीचर

Published On: 

मुंबई: बँकिंग क्षेत्रामध्ये ऑनलाईन बँकिंग संकल्पना आली आणि ग्राहकांना दैनंदिन आणि इतर बँकिंग व्यवहार करणे सुलभ झालं. यामध्ये आता भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आधारित व्यवहारांचे प्रमाण वाढलं आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएमसारख्या युपीआय आधारित अॅप्सचा देशात मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना टक्कर देण्यासाठी ऍमेझॉन नंतर आता व्हॉट्सअॅपने देखील आपले पेमेंट फीचर आणले आहे. व्हॉट्सअॅपवरुन आता पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. नुकतीच व्हॉट्सअ;ॅपला भारतात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. व्हॉट्सअॅपने जून महिन्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु केली आहे. तसेच काही व्हॉट्सअॅप युजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होती. याद्वारे कंपनीने त्यांची पेमेंट सेवा गेल्या काही महिन्यात तपासून पाहिली. लवकरच ही सेवा सर्वांना मिळणार आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने सध्या काही मोजक्या मोबाईल क्रमांकासाठी व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. लवकरच ही मर्यादा वाढवली जाणार आहे. NPCI कडून “व्हॉट्सअॅप पेमेंट सिस्टिमसाठी Go Live ची परवानगी देण्यात आली आहे. भारतात व्हॉट्सअॅप चे 400 मिलियनपेक्षा (40 कोटी) अधिक युजर्स आहेत. सुरुवातीला त्यापैकी केवळ 20 मिलियन युजर्सना (दोन कोटी ग्राहक) व्हॉट्सअॅपची पेमेंट सुविधा वापरता येईल. तसेच काही कालावाधीत ही मर्यादा वाढवली जाईल आणि लवकरच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होईल.

व्हॉट्सअॅपवरुन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पहिल्यांदा ग्राहकांना आपले व्हाट्सअप अकाउंट अपडेट करावे लागणार आहे. तर या पायऱ्यांद्वारे करता येणार व्हाट्सअप पेमेंट –

  • व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉट्स वर क्लिक करा.
  • तिथे असलेल्या Settings section वर क्लिक करा
  • Settings ओपन केल्यावर पेमेंट चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
  • त्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला बँक खाते संलग्न करण्यास सांगेल. (तेच अकाऊंट लिंक करा ज्या अकाऊंटशी लिंक्डसिमकार्ड तुमच्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्हेट असेल, तसेच तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट त्याच नंबरशी लिंक्ड असेल.)
  • बँक खाते संलग्न करताना व्हॉट्सअॅप तुम्हाला काही नियम आणि अटींवर मान्य करण्यास सांगेल. तुम्ही I agree बटणावर क्लिक करु शकता अथवा मागच्या मेनू मध्ये जाऊ शकता.
  • नियम आणि अटी स्वीकारल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर Verify करावा लागेल. इथून पुढे यूपीआय (UPI) व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल.
  • मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला विविध बँकांच्या नावांची यादी दिसेल. त्यापैकी तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे.
  • त्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला VPA म्हणजेच Virtual Payee Address बनवण्यास सांगेल, तुम्ही त्यावर क्लिक करा, VPA तयार होईल.
  • व्हॉट्सअॅप तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारेल. तसेच इतरही काही माहितीची मागणी केली जाईल (डेबिट कार्डवरील एक्सपयरी डेट, तुमची जन्मतारीख इत्यादी)
  • त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपवरील मनी ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!