Share

आता कर्नाटकातून सोलापूरमार्गे महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना टेस्टची सक्ती

Published On: 

सोलापूर : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य केल्यानंतर आता कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली असून ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल त्यांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यात आजपासून 7 मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असेल अशी माहिती देखील भरणेंनी दिली आहे.

कर्नाटक सरकार व महाराष्ट्र सरकारमध्ये कोरोना टेस्ट वरून संघर्ष ?

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारकडून खबरदारीचे पाऊल उचलले गेले आहे. कोल्हापूर जिल्ह्याकडील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता कर्नाटक सरकारने कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा होत आहे. यामुळे, महाराष्ट्र व कर्नाटक सरकार मधील वाद पुन्हा चिघळल्याचे दिसून आले होते.

गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्र देखील कर्नाटक मधील प्रवाशांना महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. ‘महाराष्ट्रतील नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकारने प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाईन करावं, आम्हाला काहीही हरकत नाही,’ अशी भूमिका सतेज पाटील यांनी स्पष्ट केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!