Share

आता काही खरंं नाही ! कोरोनाच्या लससाठी चीनने केला अमेरिकेवर सायबर हल्ला

Published On: 

अंतरराष्ट्रीय : अमेरिकेने पुन्हा एकदा चीनला लक्ष्य करत फैलावर घेतले आहे. तर कोरोनाची लस चोरण्यासाठी आमच्यावर  सायबर हल्ल्या केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येणार आहे.

चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे. यामुळे त्यांनी ही माहिती मिळविण्यासाठी सायबर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या एजन्सी आणि मेडिकल संस्थांवर सायबर हल्ले वाढू लागले आहेत. यमुळे हॉस्पिटल, रिसर्च लॅब, हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि फार्मासिटीकल कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

एका अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले की, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेजवर दररोज सायबर हल्ले होऊ लागले आहेत. जगात दोन जागा अशा आहेत की या डिपार्टमेंटवर अशा प्रकारचे हल्ले करू शकतात. त्यापैकी चीनवर आमचा संशय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरा देश रशिया  आहे.

डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार चीनी हॅकरांना अमेरिकेच्या हॉस्पिटल आणि लॅबवर हल्ला करायचा आहे. याची चिंता प्रशासनाला आहे. जॉन डेमर या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या कोरोना व्हायरसच्या लसीवर बायोमेडिकल संशोधन सुरु आहे. त्याशिवाय आता काही कोणत्यारही देशाला महत्वाचे नाहीय. जो देश या महामारीचे रामबाण औषध शोधून काढेल त्याची इतिहासात मोठी नोंद होणार आहे. यामुळे चीन यासाठी प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!