Share

सर्वात मोठी बातमी : किम जाँग-उन जिवंत, सार्वजनिक कार्यक्रमात दिसले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन हे तब्बल 20 दिवसांनंतर सार्वजनिक व्यासपीठावर दिसले आहेत. उत्तर कोरियातील माध्यांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केलंय. उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था KCNA नुसार, किम जाँग-उन यांनी एका रासायनिक खतांच्या कारखान्याचं उद्घाटन केलं. यावेळी उपस्थितांनी जयघोषात किम यांचं स्वागत केलं. ते बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक व्यासपीठावर दिसले.

उत्तर कोरियातल्या वृत्तसंस्थेकडून आलेल्या वृत्ताला इतर ठिकाणाहून अद्याप दुजोरा मिळालेलं नाहीय. मात्र, या वृत्तसंस्थेनं किम जाँग-उन यांचा उद्घाटन कार्यक्रमातील फोटोही प्रसिद्ध केलाय. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी अर्थात KCNA नं सांगितलं की, किम जाँग-उन हे त्यांची बहीण किम यो जाँग आणि उत्तर कोरियातील इतर वरिष्ठ नेत्यांसोबत कार्यक्रमाला हजर होते.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट बातम्या येत होत्या. मात्र यासंदर्भात अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेलं नव्हतं. आताही वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ते सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिल्याचं जगभरात कळलं आहे. मात्र, उत्तर कोरियाच्या प्रशासनाकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. किम जाँग-उन यांच्या प्रकृतीविषयीच्या उलटसुलट बातम्यांचं मात्र दक्षिण कोरियाच्या प्रशासनानं खंडन केलं होतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!