🕒 1 min read
मुंबई : भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.
गेले २५ वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिलेले आहेत. याची आठवण करून देत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत असा सणसणीत टोला देखील भालचंद्र शिरसाट यांनी सत्ताधार्यांना लगावला.
शिवसेनेला मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्यामुळेच पालघर लोकसभा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित, शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सदाशिव लोखंडे, मध्य दक्षिण मुंबईसाठी विद्याधर गोखले, सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे, ताडदेव महापालिका प्रभागासाठी अनिल सिंग, अंधेरीतील नगरसेविका संध्या सुनिल यादव असे ३५ ते ४० उमेदवार वेळोवेळी दिलेले आहेत.आताही शिवसेनेला योग्य उमेदवारांची वाणवा आहे म्हणूनच ते फोडाफोडीची भाषा करित आहेत. भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
