🕒 1 min read
बार्सिलोना येथे सुरू असलेल्या ‘मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस’मध्ये नोकियाने नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 हे तीन अँड्रॉईड प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन सादर केले आहेत. चीनमध्ये लॉंच केलेला नोकिया 6 हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली.
नोकिया 6 हे मॉडेलमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर आहे. याची रॅम 4 जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यातील मुख्य कॅमेरा 16 ते सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या प्रणालीवर चालणारे असून यात 3000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे.
नोकिया 5 या मॉडेलमध्ये 5.2 इंच आकारमानाचा आणि 1280 बाय 720 पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम 2 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात 13 आणि 8 मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील बॅटरी 3000 मिलीअँपिअर क्षमतेची असेल.
नोकिया 3 हे मालिकेतील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. यात 5 इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात मीडियाटेक 6737 प्रोसेसर आहे. याची रॅम 2 जीबी आणि अंतर्गत स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे हे प्रत्येकी 8 मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. तर यातील बॅटरी 2650 मिलीअँपिअर क्षमतेची आहे.
नोकिया 6 व नोकिया 5 हे मॉडेल अँड्रॉईडच्या 7.1 तर नोकिया 3 हे मॉडेल 7 नोगट आवृत्तीवर चालणारे आहे. या तिन्ही मॉडेल्समध्ये गुगलचा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. नोकिया 3, 5 आणि 6 या मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे 139 युरो (सुमारे 9800 रूपये), 189 युरो (सुमारे 13,500 रूपये) व 229 युरो (सुमारे 16,000 रूपये) इतके ठेवण्यात आले आहे.
Nokia 5
Nokia 6 बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
