टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. कोरोनाला अटकाव घालायचा असेल तर प्रत्येक कोरोना बधीताला आरोग्य सेवा मिळेल याची विशेष काळजी सरकारकडून घेतली जात आहे.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. एकही रुग्ण उपचार आणि तपासणीविना परत जाता कामा नये असे निर्देश दिले आहेत. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाने याबाबतची माहिती ट्वीटरवर दिली आहे.
माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाची माहिती –
#कोविड१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. एकही रुग्ण उपचार आणि तपासणीविना परत जाता कामा नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार शासनामार्फत अधिसूचना निर्गमित. मुंबईतील #कोविड१९ रुग्णांची संख्या पाहता त्यांना वेळेवर उपचार मिळावेत, कुणीही त्यापासून वंचित राहू नये, तसेच #कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आदेश जारी.
अन्य कुठल्याही आजारांबरोबरच #कोविड१९ ची लक्षणे नसलेल्या परंतु #coronavirus पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना #कोरोना निगा केंद्रांमध्ये पाठवावे. खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी राहण्याचा सल्ला देण्याचे त्यात नमूद.
मुंबई महानगरातील रुग्णवाहिकांचे नियंत्रण मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून करण्यात यावे. जेणेकरून रुग्णवाहिकांची ने-आण करताना सुसूत्रता येईल.
कुठलाही रुग्ण रुग्णालायत आल्यावर तातडीने त्याची अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे. अशावेळी जागेच्या उपलब्धतेनुसार तेथे रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून किंवा विलगीकरणाची सोय करून रुग्ण तपासणी केली जावी.
रुग्णांची तपासणी, त्याला अन्यत्र हलविणे, दाखल करून घेणे आणि घरी सोडणे याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी.
मुंबईतील रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांच्या अचूक व्यवस्थापनासाठी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात यावा. हा क्रमांक मुंबई महापालिकेच्या २४ तास कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिला जावा.
विशिष्ट ओळख क्रमांक असल्याशिवाय त्याला दाखल करून घेतले जाऊ नये. या कार्यपद्धतीमुळे कुठल्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत याची निश्चित माहिती मिळू शकेल.
#कोविड१९ संशयित रुग्णांना उपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन दाखल करावे. त्यांचा नमुना अहवाल १२ तासात मिळेल अशी व्यवस्था करावी, रुग्णाला असलेल्या त्रासानुसार त्याला कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे हलविण्यात यावे.
#कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाने अर्ध्या तासाच्या आत मृतदेह वॉर्ड मधून हलविण्याबाबत कार्यवाही करावी. ठरविलेल्या कार्यपद्धतीनुसार १२ तासाच्या आत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार.
#कोविड१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. एकही रुग्ण उपचार आणि तपासणीविना परत जाता कामा नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश pic.twitter.com/lmCwZz1s2E
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 30, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

