Share

कोणीही उपाशी राहणार नाही, शिवभोजनाची संख्या वाढवणार : जयंत पाटील

Published On: 

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज आपल्या फेसबुक लाईवद्वारे जनतेशी संवाद साधला.कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असून सर्वांनी एकत्र येऊन संकटाला समोर जाऊ. घरात बसा , बाहेर जाण टाळा आणि सुरक्षित राहा,  असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, पाश्चात्य विकसित देशातही कोरोना वाढला आहे. त्यामुळे आपणही खबरदारी घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी घरा बाहेर जात आहेत. त्यांनीही घरात बसल पाहिजे. आपल्या बाहेर जाण्याने ४ माणस आपल्या आजूबाजूला गोळा होतात. त्यामुळे आपणही खबरदारी घेऊन घरात बसल पाहिजे.

इस्लामपूरमध्ये 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर संपूर्ण  सील केला आहे. तसेच राज्यात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत राहणार आहे. नागरिकांनी बाजारात गर्दी करू  नये. झुंबड केल्याने संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही जयंत पाटील म्हणाले.

या आपत्तीमुळे फळबागांवर संकट आले आहे. त्यामुळे राज्य सरकार फळबागांंवर लवकरच तोडगा काढणार आहेत. तसेच अनेक मजूर पलायन करत आहेत. अशा मजुरांना आहे तिथेच अत्यावश्यक सुविधा पुरवण्याचे काम सरकार करत आहे. शिवभोजानाची संख्या वाढवण्यात येणार असून कोणीही उपाशी झोपणार याची खबरदारी सरकार घेणार आहे, असेही पाटील म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!