औरंगाबाद : पूर्वी भाजपचे खासदार आणि आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले यांनी नुकतीच वल्गणा केली आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांनी केंद्र सरकारविरोधात टीका केली नाही तर त्यांचे सिनेमे चालू देणार नाहीत अशी घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेचे सोशल मीडियावर हासू होत असल्याचं दिसतंय. कारण, कोरानामुळे सिनेमागृहात कोणी जातचं नाहीये. त्यातच दोन्ही अभिनेत्यांचे सिनेमे अशात प्रदर्शित होतील अशी काही चिन्ह नाहीत. त्यामुळे नाना पटोले यांच्या सिनेमा चालू देणार नाही या भुमिकेचे अनेकांना कोडे उमगलेच नाही.
भंडारा गोंदियाचे तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांनी २०१७ मध्ये नरेंद्र मोदींच्या धोरणांना विरोध करत पक्ष सोडला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. सुरुवातीला काँग्रेसमध्ये त्यांना फारसे महत्त्व दिले गेले नाही. परंतू २०१९ ला महाविकास आघाडीच्या सरकारात त्यांना लॉटरी लागली. ते थेट विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले. पण तिथे त्यांचे मन रमले नाही. पदाचा राजीनामा देत ते आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी केंद्र सरकारविरोधात अधिक आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली.
याच भुमिकेतून त्यांनी एका मेळाव्यात केंद्र सरकार आणि काही सेलिब्रेटिंना लक्ष्य केले. ते म्हणाले, ”मनमोहन सिंग यांचं सरकार असताना अमिताभ बच्चन, अक्षय कुमार टिवटिव करायचे, ट्वीटच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करायचे. आज ते चूप का आहेत? महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट तसंच शूटिग चालू देणार नाही. जसे ते मनमोहन सिंग सरकारच्या काळात टिवटिव करत होते. तसंच त्यांनी आता मोदी सरकारच्या काळातील अन्याय अत्याचाराविरोधात आपली भूमिका मांडावी आणि नाही मांडली तर त्यांचे सिनेमा महाराष्ट्रात बंद पाडू.
पटोले यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेय. केंद्र सरकारने सिनेमागृहात १०० टक्के प्रेक्षक बसविण्याची मुभा दिलेली आहे. मात्र, पटोले यांच्याच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अद्यापही ५० टक्के आसनक्षमतेची मर्यादा कायम ठेवलेली आहे. त्याचबरोबर राज्यात कोरोनाचे वाढत असलेले रुग्णसंख्या पाहता आहे ते सिनेमागृहे बंद होतील की काय अशी भीती थिएटरचालकांना वाटत आहे. शिवाय अनलॉकनंतर एकही बिग बजेट हिंदी सिनेमा प्रदर्शित झालेला नाहीये. अक्षय कुमारचा सुर्यवंशी, अमिताम बच्चन यांचा झूंड हे सिनेमा तयार आहेत. पण ते कधी प्रदर्शित होतील हे अनिश्चित आहेत.
याच दरम्यान, पटोले यांनी सिनेमे चालू देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्याला अक्षय कुमार, अमिताभ बच्चनतर सोडाच अद्याप कोणीही गांभिर्याने घेतलेले नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी केवळ प्रसिद्धीसाठी या प्रकारचे स्टेटमेंट दिले की काय अशी चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांची डोळ्यांची भाषा अन् उद्धव ठाकरेंनी घेतली फिरकी
- शहराचा पाणी प्रश्न सुटला?
- ‘१ मार्चपासून नगरसेवकांना लस देण्यात येईल’
- चंद्रकांत दादा, ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! हसन मुश्रीफांचा इशारा
- दहशतवादी ज्या मलाला युसूफझाईला ठार मारू इच्छितात तिच्याबद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

