Share

विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाची शक्यता कमी आहे. – सलमान खुर्शीद

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  “सध्या पक्ष एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाची शक्यता कमी आहे. तसंच पक्ष सध्या पक्ष आपलं भविष्यही ठरवू शकत नाही अशा परिस्थितीत पोहोचला आहे,” असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

ते म्हणाले, ” २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी गडबडीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आलं. या पराभवातून पक्ष अद्याप बाहेर पडला नसून पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.” लोकसभा निवडणुकीत जो पराभव झाला त्याचे एकत्रित विश्लेषणही आम्हाला करता आले नाही. दोन्ही राज्याच्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या नावाचा विचार केला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, सध्या सोनिया गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे असली तरी त्याही पक्ष नव्या अध्यक्षाच्या प्रतिक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला फक्त ५२ जागांवर विजय मिळवता आला. तर भाजपाने ३०३ जागांवर बाजी मारली. येत्या २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता काँग्रेससमोर राज्यात मोठं आव्हान असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181835275275649034?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181835478711988224?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!