Share

आरटीओ कार्यालयात ‘या’ कालावधीपर्यंत सामान्यांसाठी प्रवेशबंदी

Published On: 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील पर्मनंट आणि लर्निंग लायसन्सचे कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहे. तसेच लस घेतलेली असेल तरच आरटीओ कार्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. त्याखालील नागरिकांचे काय, असा प्रश्न वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. मात्र यामुळे अनेकांचे काम गेले अनेक दिवस अडले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निबंर्धामुळे आरटीओ कार्यालयातील पर्मनंट, लर्निंग लायसन्सची चाचणी ११ मार्चपासून बंद आहे. या चाचणीला ५ एप्रिलपासून सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ३० एप्रिलपर्यंत या दोन्ही लायसन्ससाठी चाचणी घेण्यात येणार नाही. त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा एकदा प्रतिक्षा करावी लागणार आहे.

तसेच सरकारी कार्यालयांत येणार्‍या अभ्यागतांना लस घेतलेली असेल तरच प्रवेश द्यावा, याचा ब्रेक दी चेनमध्ये समावेश आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयातील कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर्समध्ये आहेत. त्यामुळे बहुतांश जणांनी लस घेतलेली आहे. ४५ वर्षांखालील लोकांविषयी गाइडलाइन येतील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले. त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!