Share

सिमेंट, स्टील उद्योगांवर नितीन गडकरींचा हल्लाबोल !

Published On: 

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया वेस्ट इंडीज सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी स्टील आणि सिमेंट उद्योगां च्या वाढत्या दरवाढीवरून चिंता व्यक्त केली आहे.

‘सध्या सिमेंट आणि स्टील यांच्या किंमती वाढल्यामुळे सिमेंट कारखाने रियल इस्टेट क्षेत्रांमध्ये आपली मक्तेदारी निर्माण करून परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत’. या पार्श्वभूमीवर या उद्योगांचे नियमन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं.

‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून येत्या पाच वर्षात १११ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत मात्र सिमेंट आणि स्टीलचे दर असेच वाढत राहिले तर सरकारलादेखील हे प्रकल्प पूर्ण करणे कठीण आहे.’ असं गडकरी यांना सांगितलं.

सिमेंट स्टील उद्योगात स्वतःच्या खाणी असतात तर कामगार आणि ऊर्जा खर्चामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही तरी देखील उद्योगांकडून दरवाढ केली जात आहे. यामागील कारण समजू शकलेले नाही. त्यामुळे या मक्तेदारिला आळा घालण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सूचना पाठवून नियामक प्राधिकरण तयार करण्याची शिफारस करणार आहोत. असे यावेळी गडकरींनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!