Share

३ मे नंतर संपूर्ण लॉक डाऊन ऐवजी नितीन गडकरींनी सुचवला हा पर्याय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाऊनचा कालवधी १४ एप्रिलनंतर ३  मेपर्यंत वाढवण्यात आला. मात्र आता पुन्हा एकदा ३  मेनंतरही लॉकडाऊन वाढणार की नाही याविषयी चर्चा सुरु आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. ते आज टीव्ही ९ मराठी या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत, ते ठिकाण सील करुन तेथे रुग्णांची संख्या कमी होईपर्यंत काळजी घेतली पाहिजे. मात्र सरसकट सर्व जिल्ह्यांना शहरांना एकच नियम लावून बंद करणं चांगलं होणार नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

जेथे कोरोनाचे रुग्ण नाहीत तेथे कसं वागायचं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची यावर लक्ष दिलं पाहिजे. सुरुवातीला लोकांमध्ये खूप निष्काळजीपणा होता, पण आता लोक काळजी घेताना दिसत आहेत. लोक जागरुक झाले आहेत. लोक नक्की नियम पाळतील, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग थांबला आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!