Share

पालखी महामार्ग सुशोभीकरणासाठी नितीन गडकरींनी केले आवाहन !

Published On: 

नागपूर: राज्यात आणि देशात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून रस्ते निर्मितीचे काम अत्यंत झपाट्याने सुरु आहे. यामध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कॉन्क्रीट चे बनत आहेत. तर यामध्ये पालखी मार्ग देखील तयार करण्यात आले आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी महामार्गांचा सर्वंकष विकास आणि सुशोभीकरण यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

‘या दोन महामार्गांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता त्यांचे सुसंगतरीत्या सुशोभीकरण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कामात लोकसहभाग अपेक्षित असून सर्व स्तरांतील नागरिक, लोकप्रतिनिधी, वारकरी यांच्यामार्फत येणाऱ्या सूचनांच्या आधारे या कामात योग्य बाबींचा समावेश केला जाणार आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

या महामार्गांसाठीच्या सूचना नागरिकांनी www.palkhimarg.com या संकेतस्थळावर नोंदवाव्यात. तज्ज्ञांच्या समितीमार्फत सूचनांची छाननी होऊन त्यातील चांगल्या, उल्लेखनीय सूचना नोंदवलेल्या व्यक्तींचा गौरव केला जाईल, तसेच त्यांची नावे संकेतस्थळावर प्रकाशित केली जातील, असेही सांगण्यात आले आहे. सदरील दोन्ही महामार्गांसाठी एकूण 11 हजार 680 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, पूर्वापार चालत आलेली पालखी व वारी परंपरा यापुढील काळात अधिक सुकर व सोयीची होण्यासाठी या महामार्गांची मोठी मदत होईल, असा मला विश्वास वाटतो’, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हापुण्यातील हडपसरपासून मोहोळपर्यंत विकसित केला जात असून सुमारे 234 किमी लांबीचा हा प्रकल्प आहे. यासाठी अंदाजे 3 हजार 966 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भूसंपादनासह अंदाजे एकूण 7 हजार 265 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा पुणे जिल्ह्यातील पाटसपासून तोंडले-बोंडलेपर्यंत विकसित केला जात असून 136 किमी आहे. या महामार्गासाठी अंदाजे बांधकाम खर्च 2 हजार 363 कोटी रुपये असून भूसंपादनासह एकूण खर्च 4 हजार 415 कोटी रुपये अपेक्षित असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

निर्णय घेण्यात राष्ट्रवादीचे नेते प्रगल्भ;आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे : संजय राऊत

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र

धनंजय मुंडेंवर माझा विश्वास – जयंत पाटील

‘एक विहारी सब पर भारी’, भाजप खासदाराच्या टीकेवर सेहवागच प्रतिउत्तर

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!